Wednesday, February 9, 2011

Gurucharitra - Adhay 41

Chapter 41 Sayamdev is told about the Kashi-pilgrimage.

CHAPTER 41

Sayamdeo Serves Shri Guru : His Kashikhand Mahayatra
.

Namdharak asks, `How did my forefathers serve Shri Guru?'
Shri Siddha answers, Your grand father's father, Sayamdeo, had worshipped Shri Guru at Osargram. Shri Guru had affection for him. Shri Guru later came and stayed at Ganagapur. His fame spread all over the country. Knowing this, Sayamdeo also came to Ganagapur. He came to the Math, bowed to Shri Guru and prayed him. Shri Guru was pleased. He placed his palm on his head, blessed him, and said `You will be my devotee for generations.' Shri Guru asked him to bathe at the Sangam and return for the meals to the Math.

After returning from the Sangam, Sayamdeo worshipped Shri Guru with 16 upchars and offered several delicious articles of food, as naivedya. He dined with Shri Guru, who enquired about his family. Sayamdeo said, `My relatives and sons are living at Uttar Kanchi (Gadganchi) hail and healthy. I wish to stay with you and serve your holyself now.

Shri Guru said My service is difficult. I live in a town for some time, while in the forest at other time. It is troublesome to live in a forest. If your mind is firm then only you should stay here.'

Sayamdeo conceded and said, `A devotee of Shri Guru has no fear.'

Three months passed. One evening Shri Guru went to the Sangam along with Sayamdeo alone and sat below the Ashwattha tree. There was a great storm, followed by heavy rain, Sayamdeo stood stretching a cloth over Shri Guru to protect him from the rain. There was a shivering cold in the night. So Shri Guru asked Sayamdeo to go to the Math in the town and bring fire. Thick darkness and spread all over and there was lighting now and then. Shri Guru warned Sayamdeo not to look to his right or left side. Anyhow Sayamdeo reached the Math, took fire and returned. Out of curiosity, he looked to his right side and saw a Cobra going with him. He was frightened. he then looked to the left side. Here too he saw another Cobra. He recited Shri Guru's name and walked straight. He came to Shri Guru and lit the fire. The two Cobras came before Shri Guru, bowed to him and went away.

Shri Guru said to Sayamdeo, `Why are you so much afraid? I had sent these Cobras to protect you. I shall tell you a tale, about service to Shri Guru, to pass this night.

`When Shri Shiva was sitting on a peak of the Kailas mountain with Parwati, she asked him, `How can Shri Guru be served with devituib.'

Shri Shiva said, `One who serves Shri Guru with sincerity, can attain all that one desires. Brahma had an incarnation which was called Tashthra Brahma. He had a handsome son. When his thread ceremony was performed his father sent the boy to a Guru for study of Vedas and Shastras. He served the Guru devotedly. Once there was rain and the water came in the ashram of the guru. The guru told the pupil to construct a lasting house with all conveniences, which should look always new. The wife of the Guru asked the boy to bring her a blouse, whih should neither be sewn or woven. The son of the Guru said, `Bring sandals for me, that would enable me to walk on waters and take me to any desired place. The daughter of the Guru asked the boy, `Bring ear-rings for me and a play-house of a elephant tooth having one pillar and all the conveniences. Also bring pots in which food will be warm and which will not be black due to suit.

The pupil took leave of Guru and went to a forest. He was anxious how all these things could be obtained. On the way he met an ascetic, who inquired `child, why are you so worried?'

The Brahmachari boy bowed to him and said, `Kindly guide and protect me. It is my good fortune that I could see you in this forest. `He told him what his Guru, Guru's wife, son and daughter had asked him to do. He said, 'I am anxious as to how all these things can be achieved.

The aseetic assured him and said, `Don't worry. Kashi is a holy place of Vishweshwar. You go there and worship Him. All your desires will be fulfilled. Kashi is known as `Anand Kanan'. One attains all the four purushrthas aftr going there'.

The Brahmachari asked, `Where is Kashi? How can I go there?'

The ascetic - I shall take you there. Due to you, I shall also have the fortune to see the holy place again.'

Saying so both went to Kashi instantly by yogin power. The ascetic then told the Brahmachari to do Antar Grahayatra, Dakshin manasyatra and utta manasyatra. While visiting holy places bath should be taken there. Then do Oanchkroshi yatra, Shukla and dark fortnight yatras should also be performed. Worship nine Lingas and Kashi Vishveshwar. If your devotion to Guru is firm, Shri Shiva Shankar will be pleased and fulfil all your desires,' Saying this the ascetic went away.

The Brahmachari performed all the yatras as instructed by the ascetic. Shri Shankar was pleased. He appeared before the boy and asked him to have a boon. Twashthrakumar narrated his account and mentioned the articles required for Guru, Guru's wife, son and daughter. Shri Shanker blessed him saying, `You will be as efficient as Vishwakarma.'

The Brahmachari prepared all the articles skillfully returned to the Guru's place. The Guru was also pleased to see him back with success. He also blessed him saying, `You will be proficient in all Vidays.'

Shri Guru explained the greatness of Guru to Sayamdeo in this way. By this time the sun was rising on the eastern horizon. sayamdeo said, `You explained Kashi yatra in details. While hearing the same, I could see and also visit the respective holy shrines, tanks and places with your holyself and thought as if we were in Kashi. He then prayed Guru with 8 shlokas which are daily chanted after Aarati at ganagapur till now.

While praying, his throat choked and his hair stood erect on his body. Shri Guru was much pleased. he blessed him and said, `Bring your family and children here and stay with me. Do not bow to Muslims hereafter.'

Sayamdeo went to his place and returned to Ganagapur with his family and children on bhadrapad Shuddha 14, the Anant Chaturdashi day. This time he prayed Shri Guru with eight Sholakas in Kannad. Shri Guru seated him by his side and enquired about all. Sayamdeo had two sons. Shri Guru loved the elder, Nagnath. Shri Guru placed his palm on the head of Sayamdeo and said, `Your do not serve the Muslims now. You all have bath at the Sangam.'

Sayamdeo and his family bathed at the Sangam, worshipped the Ashwattha there and returned to the Math. Shri Guru said to Sayamdeo, `Today is Anant Chaturdashi. All Brahmins worship Anant on this day. You too should do Anant Puja.' Sayamdeo said, `You are my Anant.' Still Guru insisted on him to do the anant Puja.

Contd....

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा । कर जोडुनी कौतुका । नमन करी साष्‍टांगीं ॥१॥
जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । नाना धर्म विस्तारोनि । गुरुचरित्र निरोपिलें ॥२॥
तेणें धन्य झालों आपण । प्रकाश केलें महाज्ञान । सुधारस गुरुस्मरण । प्राशविला दातारा ॥३॥
एक असे माझी विनंती । निरोपावें मजप्रती । आमुच्या पूर्वजें कवणें रीतीं । सेवा केली श्रीगुरुची ॥४॥
तुम्ही सिद्ध महाज्ञानी । होतां श्रीगुरुसन्निधानीं । शिष्य झाले कवणे गुणीं । निरोपावें दातारा ॥५॥
ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्ध सांगे विस्तारोन । एकचित्तें करोनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥६॥
पूर्वीं कथानक सांगितलें । जे कां श्रीगुरुशीं भेटले । वोसरग्रामीं एक होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥७॥
तयाचें नाम सायंदेव । केली पूजा भक्तिभाव । त्यावरी प्रीति अतिस्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥८॥
तेथून आले दक्षिणदिशीं । गाणगापुरीं परियेसीं । ख्याति झाली दश दिशीं । कीर्ति वाढली बहुवस ॥९॥
ऐकोनि येती सकळ जन । करिती श्रीगुरुदर्शन । जें मनीं करिती चिंतन । पूर्ण होय तयांचें ॥१०॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरा वस्ती । नाम श्रीनृसिंहसरस्वती । भक्तवत्सल निर्धारीं ॥११॥
तुमचा पूर्वज जो का होता । सायंदेव भक्त विख्याता । त्याणें ऐकिलें वृत्तान्ता । महिमा श्रीगुरु यतीचा ॥१२॥
भक्तिपूर्वक वेगेंसी । आला गाणगापुरासी । आनंद बहु मानसीं । हर्षे निर्भर होउनी ॥१३॥
दुरुनि देखिलें गाणगाभुवन । आपण घाली लोटांगण । करी दंडप्राय नमन । ऐशापरी चालिला ॥१४॥
ऐसा दंडप्रणाम करीत । गेला विप्र मठांत । देखिले तेथें मूर्तिमंत । परात्पर श्रीगुरु ॥१५॥
साष्‍टांग नमस्कार करीत । असे चरणावरी लोळत । केशेंकरुन पाय झाडीत । भक्तिभावें करोनिया ॥१६॥
करसंपुट जोडोनि । स्तुति करी एकाग्र मनीं । त्रैमूर्ति तूंचि ज्ञानीं । गुरुमूर्ति स्वामिया ॥१७॥
धन्य धन्य जन्म आपुलें । कृतार्थ पितर माझे झाले । कोटि जन्मांचें पाप गेलें । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥
जय जयाजी श्रीगुरुमूर्ति । त्राहि त्राहि विश्वपती । परमात्मा परंज्योती । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥१९॥
तुझे चरण वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । परमात्मा तूंचि होसी । भक्तवत्सला स्वामिया ॥२०॥
तुमचे चरणाचिये प्रौढी । वसती तेथें तीर्थें कोडी । वर्णिती श्रुति घडोघडी । चरणं पवित्रं विततं पुराणं ॥२१॥
त्रैमुर्तींचा अवतार । मज दिससी साक्षात्कार । भासतसे निरंतर । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥२२॥
परब्रह्म तुम्ही केवळू । हातीं दंड कमंडलू । अमृत भरलें सोज्ज्वळू । प्रोक्षितां प्रेत उठतसे ॥२३॥
दंड धरिला या कारणें । शरणांगतातें रक्षणें । दुरितदैन्य निवारणें । निज भक्त रक्षावया ॥२४॥
रुद्राक्षमाळा भस्मधारण । व्याघ्रचर्माचें आसन । अमृतदृष्‍टि इंदुनयन । क्रूरदृष्‍टीं अग्निसूर्य ॥२५॥
चतुर्विध पुरुषार्थासी । भक्तजना तूंचि होसी । तूंचि रुद्र सत्य होसी । तूं नृसिंह जगद्‌गुरु ॥२६॥
विष्णुरुपें करिसी रक्षण । पीतांबर पांघरुण । तीर्थ समस्त तुझे चरण । भक्ताभिमानी विष्णु तूंचि ॥२७॥
वांझे कन्या पुत्र देसी । शुष्‍क काष्‍ठ आणिलें पल्लवासी । दुभविली वांझ महिषीसी । अन्न पुरविलें ब्राह्मणा ॥२८॥
विष्णुमूर्ति तूंचि जाण । त्रिविक्रमभारती ऐसी खूण । साक्ष दिधली अंतःकरण । विश्वरुप दाखविलें ॥२९॥
म्हणविले वेद पतिताकरवीं । अपार महिमा झाला पूर्वीं । नरहरिअवतार मूर्ति बरवी । आलेति भक्त तारावया ॥३०॥
ऐसी नानापरी स्तुति करीत । पुनः पुनः नमन करीत । सद्‌गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठले ॥३१॥
आनंदाश्रुलोचनीं । निघती संतोषें बहु मनीं । नव विधा भक्ति करोनि । स्तुति केली श्रीगुरुची ॥३२॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आश्वासिती । माथां हस्त ठेवोनि म्हणती । परम भक्त तूंचि आम्हां ॥३३॥
तुवा जें कां स्तोत्र केलें । तेणें माझें मन धालें । तुज वरदान दिधलें । वंशोवंशीं माझा दास ॥३४॥
ऐसा वर देउनी । गुरुमूर्ति संतोषोनि । मस्तकीं हस्त ठेवोनि । म्हणती जाय संगमासी ॥३५॥
स्नान करुन संगमासी । पूजा करीं अश्वत्थासी । त्वरित यावें मठासी । पंक्तीस भोजन करीं गा ॥३६॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती । गुरुनिरोप जेणें रीतीं । आला स्नान करोनिया ॥३७॥
षोडशोपचारें श्रीगुरुसी । पूजा करी भक्तींसी । अनेक परी पक्वान्नेंसी । भिक्षा करवी परियेसा ॥३८॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आपुले पंक्ति । समस्त शिष्यांहुनी प्रीती । ठाव देती आपलेजवळी ॥३९॥
भोजन झालें श्रीगुरुसी । शिष्यांसहित विप्रांसी । संतोषोनि आनंदेंसी । बैसले होते मठांत ॥४०॥
तया सायंदेवविप्रासी । श्रीगुरु पुसती प्रीतींसी । तुझें स्थान कोणे देशीं । कलत्र पुत्र कोठें असती ॥४१॥
पुसती क्षेमसमाधान । कैसें तुमचें वर्तन । कृपा असे परिपूर्ण । म्हणोनि पुसती संतोषें ॥४२॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे सायंदेव विस्तारोन । कन्या पुत्र बंधुजन । समस्त क्षेम असती स्वामिया ॥४३॥
उत्तरकांची म्हणोनि ग्रामीं । तेथें वसोनि आम्ही । तुझ्या कृपें समस्त क्षेमी । असों देवा कृपासिंधु ॥४४॥
पुत्रवर्ग बंधु जाणा । करिती संसारयातना । आपुले मनींची वासना । करीन सेवा श्रीगुरुची ॥४५॥
करुनि सेवा श्रीगुरुची । असेन स्वामी परियेसीं । ऐसा माझे मानसीं । निर्धार असे देवराया ॥४६॥
ऐकोन तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । आमुची सेवा असे कठिण । आम्हां वास बहुतां ठायीं ॥४७॥
एके समयीं अरण्यांत । अथवा राहूं गांवांत । आम्हांसवें कष्‍ट बहुत । तुम्ही केवी साहूं शका ॥४८॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोपिती । ऐकोन विनवी मागुती । म्हणे स्वामी अंगिकारा ॥४९॥
गुरुची सेवा करी नरू । तोचि उतरे पैल पारु । तयासी कैसें दुःख अघोरु । सदा सुखी तोचि होय ॥५०॥
चतुर्विध पुरुषार्थ । देऊं शके श्रीगुरुनाथ । त्यासी नाहीं यमपंथ । गुरुभक्ति मुख्य कारण ॥५१॥
येणेंपरी श्रीगुरुसी । सायंदेव भक्तींसी । विनवीतसे परियेसीं । संतोषी झाले श्रीगुरुमूर्ति ॥५२॥
श्रीगुरु तया विप्रा म्हणती । जैसें असे तुझे चित्तीं । दृढ असेल मनीं भक्ति । तरीच करीं अंगीकार ॥५३॥
स्थिर करोनि अंतःकरण । करितां सेवा-गुरुचरण । झाले मास तीन जाण । ऐक शिष्या नामकरणी ॥५४॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । श्रीगुरु निघाले संगमासी । सवें घेतलें सायंदेवासी । समस्तांतें वारुनी ॥५५॥
भक्ताचें अंतःकरण । पहावया गेले श्रीगुरु आपण । पूर्वज तुमचा भोळा जाण । जात असे संगमासी ॥५६॥
भक्तासहित संगमासी । गेले श्रीगुरु समयीं निशी । बैसते झाले अश्वत्थासी । सुखें गोष्‍टी करिताती ॥५७॥
दिवस गेला अस्तमानीं । श्रीगुरु विचार करिती मनीं । दृढ याचे अंतःकरणीं । कैसी करणी पाहूं म्हणती ॥५८॥
उठविती वारा अवचित । तेणें वृक्ष पडों पाहत । पर्जन्य झाला बहुत । मुसळधारा वर्षतसे ॥५९॥
सायंदेव होता जवळी । सेवा केली तये वेळीं । केला आश्रय वृक्षातळीं । वस्‍त्रेंकरुनि श्रीगुरुसी ॥६०॥
पर्जन्य वारा समस्त देखा । साहिले आपण भावें ऐका । उभा राहोनि संमुखा । सेवा करी एकभावें ॥६१॥
येणेंपरी याम दोन । पर्जन्य आला महा क्षोभोन । आणिक वारा उठोन । वाजे शीत अत्यंत ॥६२॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । शीत झालें बहुवसी । तुवां जाउनी मठासी । अग्नि आणावा शेकावया ॥६३॥
गुरुनिरोंपें तत्क्षणीं । ऐक्यभाव धरोनि मनीं । निघाला विप्र महाज्ञानी । आणावया वैश्वानर ॥६४॥
निघाला शिष्य देखोनि । श्रीगुरु म्हणती हासोनि । नको पाहूं आपुले नयनीं । उभयपार्श्वभागातें ॥६५॥
गुरुनिरोपें येणेंपरी । निघता झाला झडकरी । न दिसे वाट अंधकारीं । खुणें खुणें जात असे ॥६६॥
अंधकार महाघोर । पाऊस पडे धुरंधर । न दिसे वाटेचा प्रकार । जात असें भक्तिपूर्वक ॥६७॥
मनीं ध्याय श्रीगुरुसी । जातसे तैसा मार्गेसी । लवतां वीज संधीसी । तेणें तेजें जातसे ॥६८॥
येणेंपरी द्विजवर । पावला त्वरित गाणगापुर । वेशीपाशीं जाऊनि सत्वर । हाक मारिली द्वारपाळा ॥६९॥
तयासी सांगे वृत्तान्त । आणोनि दिधला अग्नि त्वरित । घालूनिया भांडयांत । घेवोनि गेला परियेसा ॥७०॥
नसे मार्ग अंधकार । विजेचे तेजें जातसे नर । मनीं करितसे विचार । श्रीगुरुंनीं मातें निरोपिलें ॥७१॥
दोहींकडे न पाहें निगुती । श्रीगुरु मातें निरोपिती । याची कैसी आहे स्थिति । म्हणोनि पाहे तये वेळीं ॥७२॥
आपुले दक्षिणदिशेसी । पाहतां देखे सर्पासी । भिऊनि पळतां उत्तरेसी । अद्‌भुत दिसे महानाग ॥७३॥
पांच फणी दिसती दोनी । सवेंचि येताती धावोनि । विप्र भ्याला आपुले मनीं । धावत जातसे भिऊनिया ॥७४॥
वाट सोडुनी जाय रानीं । सवेंचि येताति सर्प दोनी । जातां भयभीत होउनी । अति शीघ्र धावतसे ॥७५॥
स्मरतां झाला श्रीगुरुसी । एकभावें धैर्येंसी । जातां विप्र परियेसीं । पातला संगमाजवळीक ॥७६॥
दुरुनि देखे श्रीगुरुसी । सहस्त्रदीपज्योतीसरसी । दिसती विप्र बहुवसी । वेदध्वनि ऐकतसे ॥७७॥
जवळी जातां द्विजवरु । एकला दिसे श्रीगुरु । गेला समस्त अंधकारु । दिसे चंद्र पौर्णिमेचा ॥७८॥
प्रज्वलित केलें अग्नीसी । उजेड झाला बहुवसी । झाला विप्र सावधेसी । पाहतसे श्रीगुरुतें ॥७९॥
दोनी सर्प येवोनि । श्रीगुरुतें वंदोनि । सवेंचि गेले निघोनि । तंव हा पूर्वींच भ्यालासे ॥८०॥
श्रीगुरु पुसती तयासी । कां गा भयभीत झालासी । आम्हीं तूंतें रक्षावयासी । सर्प दोन पाठविले ॥८१॥
न धरीं आतां भय कांहीं । आमुची सेवा कठीण पाहीं । विचार करुनि आपुल्या देहीं । अंगिकारीं मुनिसेवा ॥८२॥
गुरुभक्ति असे कठिण । दृढभक्तीनें सेवा करणें । कळिकाळाचें नाहीं भेणें । तया शिष्या परियेसा ॥८३॥
सायंदेव तये वेळीं । लागतसे श्रीगुरुचरणकमळीं । विनवीतसे करुणाबहाळी । कृपा करीं म्हणोनिया ॥८४॥
गुरुभक्तीचा प्रकारु । निरोपावा मातें श्रीगुरु । जेणें माझें मन स्थिरु । होवोनि राहे तुम्हांजवळी ॥८५॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । सांगे कथा सुरसी । न गमे वेळ रात्रीसी । ब्राह्म मुहूर्त होय तंव ॥८६॥
पूर्वीं कैलासशिखरासी । बैसला होता व्योमकेशी । अर्धांगी पार्वतीसी । कथा एकान्तीं सांगतसे ॥८७॥
गिरिजा पुसे ईश्वरासी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी । विस्तारोनि आम्हांसी । सांगा म्हणे तये वेळीं ॥८८॥
शिव सांगे गिरिजेसी । सर्व साध्य गुरुभक्तीसी । करावें एकभावेंसी । शिव जो तोचि गुरु होय ॥८९॥
याचें एक आख्यान । सांगेन तुज विस्तारोन । एकचित्तें करोनि मन । ऐक गिरिजे म्हणतसे ॥९०॥
गुरुभक्ति म्हणिजे सुलभपण । तात्काळ साध्य होय जाण । अनेक तप अनुष्‍ठान । करितां विलंब परियेसीं ॥९१॥
नाना तपें अनुष्‍ठानें । करिती यज्ञ महाज्ञानें । त्यांतें होती महाविघ्नें । साध्य होतां दुर्लभ ॥९२॥
जो गुरुभक्ति करी निर्मळ । साध्य होईल तात्काळ । यज्ञदान तपफळ । सर्व सिद्धि त्यासी होती ॥९३॥
सुलभ असे अप्रयास । जो जाणे गुरुकुलवास । एकभावें धरोनि कांस । आराधावें श्रीगुरुसी ॥९४॥
याचा एक दृष्‍टान्त । सांगेन ऐका एकचित्त । ब्रह्मयाचा अवतार व्यक्त । त्वष्‍टाब्रह्मा परियेसा ॥९५॥
तयासी झाला एक कुमर । अतिलावण्य सुंदर । सर्वधर्मकुशल धीर । योग्य झाला उपनयना ॥९६॥
त्वष्‍टाब्रह्मा पुत्रासी । व्रतबंध करी परियेसीं । करावया विद्याभ्यासासी । गुरुचे घरीं निरविला ॥९७॥
गुरुची सेवा नानापरी । करीतसे ब्रह्मचारी । वर्ततां ऐशियापरी । अपूर्व एक वर्तलें ॥९८॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला पर्जन्य बहुवशी । पर्णशाळा परियेसीं । गळतसे गुरुची ॥९९॥
तये वेळीं शिष्यासी । निरोपिती गुरु त्यासी । त्वरित करावें आम्हांसी । एक गृह दृढ ऐसें ॥१००॥
पर्णशाळा पतिवर्षीं । जीर्ण होतसे परियेसीं । गृह करावें दृढतेंसी । कधीं जीर्ण नोहे ऐसें ॥१॥
न तुटे कधीं राहे स्थिर । दिसावें रम्य मनोहर । असावें सर्व परिकर । करीं शीघ्र ऐसें गृह ॥२॥
ऐसें गुरु निरोपिती । तेच समयीं गुरुची सती । सांगतसे अतिप्रीतीं । मातें कुंचकी आणावी ॥३॥
नसावी विणली अथवा शिवली । विचित्र रंगीत पाहिजे केली । माझ्या अंगप्रमाण वहिली । त्वरित आणीं म्हणतसे ॥४॥
गुरुपुत्र म्हणे शिष्यासी । मागेन तें आणीं वेगेंसी । पादुका पाहिजेत आम्हांसी । उदकावरुनि चालती ऐशा ॥५॥
अथवा चिखल न लागे त्यांसी । न व्हाव्या अधिक पायांसी । जेथें चिंतू मानसीं । तेथें घेऊनि जाती ऐशा ॥६॥
इतुकिया अवसरीं । गुरुकन्या काय करी । जातां तयाचा पल्लव धरी । आपणा कांहीं आणावें ॥७॥
उंच तानवडें आपणासी । घेऊनि यावें परियेसीं । आणिक आणा खेळावयासी । घरकुल एक आपणा ॥८॥
कुंजराचें दांतें बरवें । घरकुल तुवां आणावें । एकस्तंभी असावें । कधीं न तुटे न होय जीर्ण ॥९॥
जेथें नेईन तेथें यावें । सोपस्कारासहित आणावें । पाट ठाणवीं असावें । तया घराभीतरीं ॥११०॥
सदा दिसावें नूतन । वावरत असावें आपें आपण । करावया पाक निष्पन्न । मडकीं करुनि आणीं पां ॥११॥
आणिक एक सांगेन तुज । रांधप करावया शिकवी मज । पाक केलिया उष्ण सहज । असों नयें अन्न आणा ॥१२॥
पाक करिता मडकियेसी । न लागे काजळ परियेसीं । आणोनि दे गा भांडीं ऐसीं । आणिक सर्व सोपस्कार ॥१३॥
गुरुकन्या ऐसें म्हणे । अंगिकारिलें शिष्यराणें । निघता झाला तत्क्षणें । महा अरण्यांत प्रवेशला ॥१४॥
मनीं चिंता बहु करी । आपण बाळ ब्रह्मचारी । काय जाणें त्यांचे परी । केवी करुं म्हणतसे ॥१५॥
पत्रावळी करुं नेणें । इतुकें मातें कधीं होणें । स्मरतसे एकाग्र मनें । श्रीगुरुचरण देखा ॥१६॥
म्हणे आतां काय करुं । मातें कोण आधारु । बोल ठेवील माझा गुरु । शीघ्र इतुकें न करितां ॥१७॥
कवणापासीं जाऊं शरण । कवण राखील माझा प्राण । कृपानिधि गुरुविण । ऐसा कवण असे दुजा ॥१८॥
जरी नायकें गुरुचा बोल । शाप देईल तात्काळ । ब्रह्मचारी आपण बाळ । म्हणोनि अंगिकार कां केला ॥१९॥
काय गति आपणासी । आतां जाऊं कवणापासीं । अशक्‍त बाळ मी अज्ञानेसी । अंगिकार कां केला ॥१२०॥
गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण । वेंचीन आतां आपुला प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥२१॥
ऐसें महा अरण्यांत । जातसे बाळ चिंता करीत । श्रमोनिया अत्यंत । निर्वाणमनें जातसे ॥२२॥
पुढें जातां मार्ग क्रमित । भेटला एक अवधूत । तेणें बाळ देखिला तेथ । पुसता झाला तये वेळीं ॥२३॥
कवण बाळा कोठें जासी । चिंताव्याकुळ मानसीं । विस्तारोनि आम्हांसी । सांग म्हणे तये वेळीं ॥२४॥
ऐसें म्हणतां ब्रह्मचारी । जाऊनिया नमस्कारी । म्हणे स्वामी तारीं तारीं । चिंतासागरीं बुडतसें ॥२५॥
भेटलासि तूं निधानु । जैसी वत्सालागीं धेनु । दुःखी झालों होतों आपणु । देखतां मन निवालें ॥२६॥
जैसे चकोरपक्षियातें । चांदणें देखतां मन हर्षतें । तैसें तुझ्या दर्शनमात्रें । आनंद झाला स्वामिया ॥२७॥
माझें पूर्वार्जित पुण्य । कांहीं होतें म्हणोन । तुम्ही भेटलेंती निधान । कृपासिंधु परमपुरुषा ॥२८॥
सांगा आपुलें नाम कवण । आगमन झालें कोठून । पहा हें निर्मनुष्य अरण्य । येथें तुम्ही भेटलेती ॥२९॥
व्हाल तुम्ही ईश्वरु । मातें कृपा केली गुरु । तुम्हां देखता मनोहरु । अंतःकरण स्थिर झालें ॥१३०॥
कीं होसील कृपाळू । सत्त्वप्रिय भक्तवत्सलू । मी दास तुझा करीं सांभाळू । म्हणोनि चरणीं लागला ॥३१॥
नमितां तया बाळकासी । उठवीतसे तापसी । आलिंगोनि महाहर्षी । आश्वासीतसे तये वेळीं ॥३२॥
मग पुशिला वृत्तान्त । बाळ सांगे समस्त । गुरुंनीं जी जी मागितली वस्त । कवणेंपरी साध्य होय ॥३३॥
आपण बाळ ब्रह्मचारी । न होय कार्य तें अंगिकारीं । आतां पडिलों चिंतासागरीं । तारीं स्वामी म्हणतसे ॥३४॥
मग अभय देऊनि अवधूत । तया बाळातें म्हणत । सांगेन तुज एक हित । जेणें तुझें कार्य साधे ॥३५॥
विश्वेश्वर आराधन । असे एक निधान । काशीपूर महास्थान । सकळाभीष्‍टें साधती ॥३६॥
पंचक्रोश असे क्षिति । तया आगळी विख्याति । विष्णुमुख्य ऋषि प्रजापति । तेथें वर लाधले ॥३७॥
ब्रह्मा सृष्‍टि रचावयासी । वर लाधला त्या स्थळासी । वर दिधला विष्णूसी । समस्त सृष्‍टि पाळावया ॥३८॥
काशीपूर महास्थान । तुवां तेथें जातांचि जाण । होईल तुझी कामना पूर्ण । संदेह न धरीं मनांत ॥३९॥
तुवां जावें त्वरितेंसी । जें जें वसे तव मानसीं । समस्त विद्या लाधसी । विश्वकर्मा तूंचि जाण ॥१४०॥
चतुर्विध पुरुषार्थ । साध्य होतील त्वरित । यापरीस आणिक स्वार्थ । काय असे सांग मज ॥४१॥
तोचि देव असे दयाळ । विचित्र असे त्याचा खेळ । उपमन्यु म्हणोनि होता बाळ । तयातें दिधला क्षीरसिंधु ॥४२॥
नामें आनंदकानन । विख्यात असे महास्थान । समस्तांची कामना पूर्ण । तये ठायीं होतसे ॥४३॥
नाम असे पुरी काशी । समस्त धर्मांची हे राशी । सकळ जीवजंतूंसी । मोक्षस्थान परियेसा ॥४४॥
जे वास करिती तये स्थानीं । त्यांतें देखताचि नयनीं । जाती दोष पळोनि । स्थानमहिमा काय सांगूं ॥४५॥
ऐसें काशीस्थान असतां । कां बा करिसी तूं चिंता । तेथील महिमा वर्णितां । अशक्य माझे जिव्हेसी ॥४६॥
तया काशीनगरांत । जे जन तीर्थे हिंडत । एकेक पाउलीं पुण्य बहुत । अश्वमेधफळ असे ॥४७॥
धर्म अर्थ काम मोक्ष । जी जी मनीं असे कांक्ष । जातांचि होईल प्रत्यक्ष । संदेह न धरीं मनांत ॥४८॥
ऐकोनिया ब्रह्मचारी । साष्‍टांगीं नमस्कारी । कोठें असे काशीपुरी । आपण असे अरण्यात ॥४९॥
आनंदकानन म्हणसी । स्वर्गीं असे कीं भूमीसी । अथवा जाऊं पाताळासी । कोठें असे सांगा मज ॥१५०॥
या संसारसागरासी । तूंचि तारक जगा होसी । ज्ञान मातें उपदेशीं । तारीं मातें स्वामिया ॥५१॥
ऐशिया काशीपुरासी । मातें कोण नेईल हर्षीं । विनवूं जरी तुम्हांसी । घेवोनि जावें म्हणोनिया ॥५२॥
कार्य असलिया तुम्हांसी । आम्हां कैसी बुद्धि देशी । मी बाळक तुम्हांसी । म्हणोनि चरणीं लागला ॥५३॥
ऐसें म्हणता तापसी । आपण नेईन म्हणे हर्षी । तुजकरितां आपणासी । यात्रालाभ घडे थोर ॥५४॥
यापरतें आम्हांसी । काय लाभ विशेषीं । वृथा जन्म मानवासी । काशीवास न करितां ॥५५॥
तुजकरितां आपणासी । दर्शन घडे पुरी काशी । चला जाऊं त्वरितेंसी । म्हणोनि दोघे निघाले ॥५६॥
मनोवेगें तात्काळीं । पातले विश्वेश्वराजवळीं । तापसी म्हणे तये वेळीं । बाळका यात्रा करीं आतां ॥५७॥
बाळ म्हणें तयासी । स्वामी मातें निरोप देसी । नेणें यात्रा आहे कैसी । कवणेंपरी रहाटावें ॥५८॥
आपण बाळ ब्रह्मचारी । नेणें तीर्थ कवणेंपरी । कवणें विधिपुरःसरीं । विस्तारोनि सांगा मज ॥५९॥
तापसी म्हणे तयासी । सांगेन यात्राविधीसी । तुंवा करावें भावेंसी । नेमें भक्तिपूर्वक ॥१६०॥
पहिलें मणिकर्णिकेसी । स्नान करणें नेमेंसी । जाऊनिया विनायकासी । पांचाळेश्वरा नमावें ॥६१॥
मग जावें महाद्वारा । विश्वेश्वरदर्शन करा । पुनरपि यावें गंगातीरा । मणिकर्णिकास्नान करावें ॥६२॥
मणिकर्णिकेचा ईश्वर । पूजूनिया निर्धार । जाऊनिया कंबळेश्वर । पूजा करीं गा भावेंसी ॥६३॥
पुढें ईश्वरवासुकीसी । पूजा करी भक्तींसी । पर्वतेश्वर पूजोनि हर्षी । गंगाकेशव पूजीं मग ॥६४॥
ललिता देवी पूजोनि । मग जावें तेथूनि । जरासंधेश्वर ध्यानीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥६५॥
सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर । तयापुढें वाराहेश्वर । पूजा करीं गा ब्रह्मेश्वरी ॥६६॥
अगस्त्येश्वर कश्यपासी । पूजा करीं हरिहरेश्वरासी । वैजनाथ महाहर्षी । ध्रुवेश्वर पूजीं मग ॥६७॥
गोकर्णेश्वर असे थोर । पूजा करीं गा हाटकेश्वर । अस्थिक्षेप तटाकेश्वर । किंकरेश्वर पूजावा ॥६८॥
भारतभूतेश्वरासी । पूजा करीं गा भावेंसी । चित्रगुप्तेश्वरासी । चित्रघंट पूजावा ॥६९॥
पाशुपतेश्वर निका । पूजा करोनि तेथें बाळका । पितामह असे जो का । ईश्वरातें पूजावें ॥१७०॥
कल्लेश्वरातें वंदूनी । पुढें जावें एक मनीं । चंद्रेश्वरातें पूजोनि । पूजा करीं गा विश्वेश्वरा ॥७१॥
पुढें पूजीं विघ्नेश्वर । त्यानंतर अग्नीश्वर । मग पूजा नागेश्वर । हरिश्चंद्रेश्वर पूजीं जाण ॥७२॥
चिंतामणि विनायका । सोमनाथ विनायक देखा । पूजा करोनि ऐका । वसिष्‍ठ वामदेव पूजावा ॥७३॥
पुढें त्रिसंध्येश्वर । पूजीं लिंग असे थोर । विशालाक्ष मनोहर । धर्मेश्वर पूजावा ॥७४॥
विश्वबाहु पूजा निका । पुढें आशा-विनायका । वृद्धादित्य असे जो का । पूजा करीं वो मनोभावें ॥७५॥
चतुर्वक्रेश्वर असे थोर । लिंग असे मनोहर । पूजा करीं गा ब्रह्मेश्वर । अनुक्रमें करुनिया ॥७६॥
पुनः प्रकामेश्वर असे खूण । पुढें ईश्वरईशान । चंडी चंडेश्वरा जाण । पूजा करीं भक्तींसी ॥७७॥
पूजीं भवानीशंकर । धुंडिराज मनोहर । अर्ची राजराजेश्वर । लंगूलेश्वर पूजीं मग ॥७८॥
नकुलेश्वर पूजेसी । तुवां जावें भक्तींसी । परान्नपरद्रव्येश्वरासी । पाणिग्रहणेश्वर पूजीं मग ॥७९॥
गंगेश्वर मोरेश्वर पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान । ज्ञानेश्वर अर्चून । नंदिकेश्वर पूजीं मग ॥१८०॥
निष्कलंकेश्वर थोर । लिंग असे मनोहर । पूजीं मार्कंडेयेश्वर । असुरेश्वर पूजीं मग ॥८१॥
तारकेश्वर असे थोर । लिंग बहु मनोहर । पूजा महाकाळेश्वर । दंडपाणि पूजीं मग ॥८२॥
महेश्वरातें पूजोनि । अर्ची मोक्षेश्वर ध्यानीं । वीरभद्रेश्वरसुमनीं । पूजा करीं गा बाळका ॥८३॥
अविमुक्तेश्वरापासीं । तुवां जाऊनियां हर्षी । पूजा करीं गा भावेंसी । मोदादि पंच विनायका ॥८४॥
आनंदभैरवपूजा करीं । पुनरपि जाय महाद्वारीं । जेथें असे मन्मथारि। विश्वनाथ पूजावा ॥८५॥
बाळा तूंचि येणेंपरी । अंतरगृहयात्रा करीं । मुक्तिमंडपाभीतरीं जाऊनिया मंत्र म्हणावा ॥८६॥
श्लोक ॥ अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता । न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥१॥
इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान्भवेत् विश्रम्य यायाद्भवने निष्पापः पुण्यभाग्भवेत्॥२॥
ऐसा मंत्र जपून । विश्वनाथातें नमून । मग निघावें तेथून । दक्षिणमानसयात्रेसी ॥८७॥
मणिकर्णिकेसी जाउनी । स्नान उत्तरवाहिनी । विश्वनाथातें पूजोनि । संकल्पावें यात्रेसी ॥८८॥
तेथोनि निघावें हर्षीं । मोदादि पंच विनायकांसी । पूजा करीं गा भक्तींसी । धुंडिराज पूजीं मग ॥८९॥
पूजीं भवानीशंकर । दंडपाणि नमन कर । विशालाक्षा अवधार । पूजा तुम्ही भक्तींसी ॥१९०॥
स्नान धर्मकूपेसी । श्राद्धविधि करा हर्षीं । पूजा धर्मेश्वरासी । गंगाकेशव पूजीं मग ॥९१॥
पूजावी देवी ललिता । जरासंघेश्वर नमितां । पूजीं मग सोमनाथा । वराहेश्वरा भक्तींसी ॥९२॥
दशाश्वमेधतीर्थेसी । स्नान करीं श्राद्धेंसी । प्रयागतीर्थें परियेसीं । स्नान श्राद्ध करावें ॥९३॥
पूजोनिया प्रयागेश्वरासी । दशाश्वमेध ईश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । शीतलेश्वर अर्चीं मग ॥९४॥
अर्ची मग वंदि देवी । सर्वेश्वर मनोभावीं । धुंडिराज भक्ति पूर्वीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥९५॥
तिळभांडेश्वर देखा । पूजा करोनि पुढें ऐका । रेवाकुंडीं स्नान निका । मानससरोवरीं मग स्नान ॥९६॥
श्राद्धादि पितृतर्पण । मानसेश्वर मग पूजोन । मनकामना पावे जाण । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥९७॥
केदारकुंडीं स्नान । करावें तेथें तर्पण । केदारेश्वर पूजोन । गौरीकुंडीं स्नान करा ॥९८॥
पूजीं वृद्धकेदारेश्वर । पूजीं मग हनुमंतेश्वर । पूजोनिया रामेश्वर । स्नान श्राध्द कृमिकुंडीं ॥९९॥
सिद्धेश्वरा करीं नमन । करुनि स्वप्नकुंडीं स्नान । स्वप्नेश्वर पूजोन । स्नान करीं गा संगमांत ॥२००॥
संगमेश्वर पूजोन । लोलार्ककूपीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन । गतिप्रदीप ईश्वरासी ॥१॥
पूजीं अर्कविनायका । पाराशरेश्वरा अधिका । पूजा करोनि बाळका । सन्निहत्य कुंडीं स्नान करीं ॥२॥
कुरुक्षेत्र कुंड देखा । स्नान करावें विशेखा । सुवर्णादि दानादिका । तेथें तुम्हीं करावें ॥३॥
अमृतकुंडीं स्नान निका । पूजीं दुर्गा विनायका । दुर्गादेवीसी बाळका । पूजा करीं मनोभावें ॥४॥
पुढें चौसष्‍ट योगिनी । पूजा करीं गा मनकामनीं । कुक्कुट द्विजातें वंदुनी । मंत्र तेथें जपावा ॥५॥
श्लोक ॥ वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः । तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्‍नः सुस्वप्नो भवेत्‌ ॥६॥
पुढें मासोपवासासी । पूजिजे गोबाईसी । सात कवडया घालूनिया तिसी । नमन भावें करावें ॥७॥
पूजा करीं रेणुकेसी । पुढें स्नान करीं हर्षी । शंखोद्धारकुंडेसी । शंखविष्णु पूजिजे ॥८॥
कामाक्षिकुंडीं करीं स्नान । कामाक्षिदेवी पूजोन । अयोध्याकुंडीं करीं स्नान । सीताराम पूजावा ॥९॥
लवांकुशकुंडीं करीं स्नान । लवांकुशातें पूजोन । लक्ष्मीकुंडीं करीं स्नान । लक्ष्मीनारायण पूजावा ॥२१०॥
सूर्यकुंडीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन । सांबादित्य पूजोन । जावें पुढें बाळका ॥११॥
वैजनाथकुंड बरवें । तेथें स्नान तुवां करावें । वैजनाथातें पूजावें । एकभावेंकरुनिया ॥१२॥
गोदावरीकुंडेसी । स्नान करा भक्तींसी । गौतमेश्वर लिंगासी । पूजीं बाळ ब्रह्मचारी ॥१३॥
अगस्तिकुंडीं जावोनि । अगस्तेश्वरा नमूनि । स्नान करीं मनापासोनि । पूजा करीं भक्तिभावें ॥१४
शुक्रकूपीं करीं स्नान । करी शुक्रेश्वर अर्चन । मग पुढें अन्नपूर्णा नमून । पूजा करीं भावेंसी ॥१५॥
धुंडिराजातें पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान । ज्ञानेश्वर अर्चोन । दंडपाणि पूजावा ॥१६॥
आनंदभैरव वंदोनि । महाद्वारा जाऊनि । साष्‍टांगेसी नमोनि । विश्वनाथा अर्चिजे ॥१७॥
ऐसें दक्षिणमानस । यात्रा असे विशेष । ब्रह्मचारी करी हर्ष । योगिराज सांगतसे ॥१८॥
आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि आहे कैशी । संकल्प करोनिया हर्षी । निघावें तुवां बाळका ॥१९॥
जावें पंचगंगेसी । स्नान करीं महाहर्षी । कोटिजन्मपाप नाशी । प्रख्यात असे पुराणीं ॥२२०॥
पंचगंगा प्रख्यात नामें । सांगेन असतीं उत्तमें । किरणा धूतपापा नामें । तिसरी पुण्यसरस्वती ॥२१॥
गंगा यमुना मिळोनी । पांचही ख्याति जाणोनि । नामें असती सगुणी । ऐक बाळा एकचित्तें ॥२२॥
कृतयुगीं त्या नदीसी । धर्मनदी म्हणती हर्षी । धूतपापा नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥२३॥
बिंदुतीर्थ द्वारापासी । नाम जाण विस्तारेंसी । कलियुगाभीतरीं तिसी । नाम झालें पंचगंगा ॥२४॥
प्रयागासी माघमासीं । स्नान करितां फळें जैसीं । कोटिगुण पंचगंगेसी । त्याहूनि पुण्य अधिक असे ॥२५॥
ऐशापरी पंचगंगेसी । स्नान करीं गा भावेंसी । बिंदुमाधवपूजेसी । पूजा करीं गा केशवा ॥२६॥
गोपालकृष्ण पूजोनि । जावें नृसिंहभुवनीं । मंगळागौरी वंदोनि । गभस्तेश्वर पूजावा ॥२७॥
मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें भक्तींसी । पुनरपि जावें हर्षी । विश्वेश्वरदर्शना ॥२८॥
मागुती मुक्तिमंडपासी । तुवां जावें भक्तींसी । संकल्पावें विधींसी । निघावें उत्तरमानसा ॥२९॥
मग निघा तेथून । आदित्यातें पूजोन । अमर्दकेश्वर अर्चोन । पापभक्षेश्वरा पूजिजे ॥२३०॥
नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें वंदूनि । क्षेत्रपाळातें अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥३१॥
पूजा करोनि काळेश्वरा । हंसतीर्थी स्नान करा । श्राद्धपितृकर्म सारा । ऐक बाळा एकचित्तें ॥३२॥
कृत्तिवासेश्वरा देखा । पूजा करोनि बाळका । पुढें जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥३३॥
तेथें आचमन करोनि । रत्‍नेश्वरातें पूजोनि । सीतेश्वरा अर्चोनि । दक्षेश्वर पूजीं मग ॥३४॥
चतुर्वक्रेश्वरीं पूजा । करीं वो बाळा तूं वोजा । पुढें स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जावें ॥३५॥
काळेश्वराचे पूजेसी । तुवां जावें भक्तींसी । अपमृत्येश्वरा हर्षी । पूजा करीं गा बाळका ॥३६॥
मंदाकिनी स्नान करणें । मध्यमेश्वरातें पूजणें । तेथोनि मग पुढें जाणें । जंबुकेश्वर पूजावया ॥३७॥
वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें भक्तींसी । दंडखात कूपेसी । स्नान श्राद्ध तूं करीं ॥३८॥
पुढें भूतभैरवासी । पूजिजे ईशानेश्वरासी । जैगीषव्यगुहेसी । नमन करुनि पुढें जावें ॥३९॥
घंटाकुंडीं स्नान करीं । व्यासेश्वरातें अर्चन करीं । कंदुकेश्वरातें अवधारीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४०॥
ज्येष्ठवापीं स्नान करणें । ज्येष्ठेश्वरातें पूजणें । सवेंचि तुवां पुढें जाणें । स्नान सप्तसागरांत ॥४१॥
तेथोनि वाल्मीकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । भीमलोटा जाऊनि हर्षी । भीमेश्वर पूजावा ॥४२॥
मातृ-पितृकुंडेसी । करणें श्राद्धविधीसी । पिशाचमोचन तीर्थेसी । पुढें जावें अवधारा ॥४३॥
पुढें कपर्दिकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । कर्कोटकवापीसी । स्नान करीं गा बाळका ॥४४॥
कर्कोटकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । पुढें ईश्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥४५॥
अग्नीश्वराचे पूजेसी । चक्रकुंडीं स्नानासी । तुंवा जावें भक्तींसी । श्राद्धकर्म करावें ॥४६॥
उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं करीं स्नान । ओंकारेश्वर अर्चोन । कपिलेश्वर पूजीं मग ॥४७॥
ऋणमोचन तीर्थेसी । श्राद्धादि करावीं भक्तींसी । पापविमोचनतीर्थेसी । स्नानादि श्राद्धें करावीं ॥४८॥
तीर्थ कपालमोचन । स्नान श्राद्ध तर्पण । कुलस्तंभाप्रती जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥४९॥
असे तीर्थ वैतरणी । श्राद्ध करावें तेथें स्नानीं । विधिपूर्वक गोदानीं । देतां पुण्य बहुत असे ॥२५०॥
मग जावें कपिलधारा । स्नान श्राद्ध तुम्ही करा । सवत्सेसी द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥५१॥
वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें तेथून । ज्वालानृसिंह वंदोन । वरुणासंगमीं तुम्हीं जावें ॥५२॥
स्नान श्राद्ध करोनि । केशवादित्य पूजोनि । आदिकेशव अर्चोनि । पुढें जावें परियेसा ॥५३॥
प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान श्राद्ध तुवां करावें । प्रल्हादेश्वरातें पूजावें । एकभावें परियेसा ॥५४॥
कपिलधारा तीर्थ थोर । स्नान करावें मनोहर । पूजोनि त्रिलोचनेश्वर । असंख्यातेश्वरा पूजिजे ॥५५॥
पुढें जावें महादेवासी । पूजा करीं गा भक्तींसी । द्रुपदेश्वर सादरेंसी । एकभावें अर्चावा ॥५६॥
गंगायमुनासरस्वतींशीं । तिन्ही लिंगें विशेषीं । पूजा करीं गा भक्तींसी । काम्यतीर्थ पाहें मग ॥५७॥
कामेश्वरातें पूजोनि । गोप्रतारतीर्थ स्नानीं । पंचगंगेसी जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥५८॥
मणिकर्णिकास्नान करणें । जलशायीतें पूजणें । हनुमंतातें नमन करणें । मोदादि पंच विनायकांसी ॥५९॥
पूजा अन्नपूर्णेसी । धुंडिराज परियेसीं । ज्ञानवापीं स्नानेंसी । ज्ञानेश्वर पूजावा ॥२६०॥
पूजीं दंडपाणीसी । मोक्षलक्ष्मीविलासासी । पूजा पंचपांडवासी । द्रौपदीदुपदविनायका ॥६१॥
पूजा आनंदभैरवासी । अविमुक्तेश्वर हर्षीं । पूजोनिया संभ्रमेंसी । विश्वनाथ संमुख सांगें ॥६२॥
श्लोक ॥ उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता । न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥६३॥
ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगें नमस्कारुनि । मग निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥६४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र ऐकतां संतोषीं । येणेंचि तूं पावशी । चारी पुरुषार्थ इह सौख्य ॥६५॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टे साधिजे ॥६६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीखंडीं यात्रा निरोपित । कथा असती पुराणविख्यात । एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥२६७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीमहायात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥

ओवीसंख्या ॥२६७॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

क्रमशः

No comments:

Post a Comment