Wednesday, January 19, 2011

Gurucharitra - Adhyay 27

Chapter 27 Eventually, the Guru calls a Harijan and applies Bhasma (holy ash) and show him his previous and next 3 births (total of 7 including the current one). In one of the births he is born a Brahmin (named Adhyapaka). The Guru asks the Harijan to discuss on vedas with the two brahmins. The Brahmins give up and eventually are punished by Guru to become a Bramha Rakshasa (a sort of demon who feeds himself on animals including humans).

CHAPTER 27

Harijan Becomes A Learned Brahmin.

Shri Guru saw a man passing by. He asked his disciples to call him. He was a Harijan. He bowed to Shri Guru and prayed for liberation.

Shri Guru gave a stick to a disciple and asked him to draw seven parallel lines. On doing this shri Guru asked the Harijan to cross a line. The Harijan crossed the first line and Shri Guru asked him who he was. he said he was a Kirat. On crosssing the second line, he had more knowledge. On crosssing the third he said he was a gangasut i.e. a boatman. On crossing the fourth he became a Shudra. On crosssing the fifth he became Somdatta Vaishya. On crossing the sixth he was a Kshatriya named godavary. On crosssding the seventh line, he said, `I am a Brahmin. I know Vedas, Shastras, Vyakran and my name is Adhyapak (Teacher).

Shri Guru said, `These two Brahmins have come to discuss Vedashastras. You may discuss with them' So saying he asked him to apply enhanted vibhuti to his body due to which he looked more bright.

Seeing this miracle, the Brahmins began to tremble with fear and started getting pain in the heart. They fell on the feet of Shri Guru and said, `We are great offenders. Kindly forgive us and liberate us. You are incarnation of three Gods and Guru of the world. Your greatness is indescribable.'

Shri Guru said, `You have harassed Trivikram Muni and have committed many other offences' You will become brahma-rakshasas and have to suffer for your sins.'

The Brahmins again entreated, `How shall we be free from this worldly sea?'

Shri Guru : 'You shall be Brahma-Rakshasas for twelve years. Shuknarayan, a Brahmin will come and advise you and then your sins will be wiped off and you will be liberated. You go to the river now.' The Brahmins went to the river. They had severe heart-pain and they died, They lived as Brahma-Rakshasas and after twelve years they were liberated.

The Harijan Brahmin said to Shri Guru, 'I was a Brahmin, then how was I degenerated? What sins had I committead? Kindly enlighten me'.

Contd....

श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा विनवीतसे वचना । ऐका श्रोते एकचित्ते ॥१॥

जयजयाजी सिद्ध योगी । तू तारक आम्हा जगी । ज्ञानप्रकाश करणेलागी । दिले दर्शन चरणांचे ॥२॥

चतुर्वेद विस्तारेसी । श्रीगुरु निरोपिती विप्रांसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥३॥

शिष्यवचन ऐकोनि । सांगता झाला विस्तारोनि । ऐक शिष्या नामकरणी । अनुपम महिमा श्रीगुरूची ॥४॥

किती प्रकारे विप्रांसी । श्रीगुरु सांगती हितासी । न ऐकती द्विज तामसी । म्हणती वाद का पत्र देणे ॥५॥

ऐसे उत्तर ऐकोनि कानी । कोप करिती श्रीगुरु मनि । जैसे तुमचे अंतःकरणी । तैसे सिद्धी पाववू म्हणती ॥६॥

सर्पाचे पेटारियासी । कोरू जाता मूषक कैसी । जैसा पतंग दीपासी । करी आपुला आत्मघात ॥७॥

तैसे विप्र मदोन्मत्त । श्रीगुरु न ओळखत । बळे आपुले प्राण देत । दिवांधवत्‍ द्विज देखा ॥८॥

इतुके वर्तता ते अवसरी । श्रीगुरु देखती नरासी दूरी । शिष्यासी म्हणती पाचारी । कवण जातो मार्गस्थ ॥९॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले सेवक धावोनि । त्या नराते पाचारोनि । आणिला गुरुसन्मुख ॥१०॥

गुरु पुसती त्यासी । जन्म कवण जातीसी । तो वृत्तान्त सांग मजसी । म्हणोनि पुसती तये वेळी ॥११॥

श्रीगुरुवचन ऐकोन । सांगे आपण जातिहीन । मातंग नाम म्हणोन । स्थान आपुले बहिर्ग्रामी ॥१२॥

तू कृपाळू सर्वा भूती । म्हणोनि पाचारिले प्रीती । आपण झालो उद्धारगति । म्हणोनि दंडवत नमन करी ॥१३॥

ऐसे कृपाळू परमपुरुष । दृष्टि केली सुधारस । लोहासी लागता परिस । सुवर्ण होता काय वेळ ॥१४॥

तैसे तया पतितावरी । कृपा केली नरहरी । दंड देवोनि शिष्या करी । रेखा सप्त काढविल्या ॥१५॥

श्रीगुरु म्हणती पतितासी । एक रेखा लंघी रे ऐसी । आला नर वाक्यासरसी । आले ज्ञान आणिक तया ॥१६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कवणे कुळी जन्मलासी । पतित म्हणे किरातवंशी । नाम आपुले वनराखा ॥१७॥

दुसरी रेका लंघिता । ज्ञान झाले मागुता । बोलू लागला अनेक वार्ता । विस्मय करिती तये वेळी ॥१८॥

तिसरी रेखा लंघी म्हणती । त्यासी झाली ज्ञातिस्मृति । म्हणे गंगापुत्र निश्चिती । वास तटी गंगेच्या ॥१९॥

लंघिता रेखा चवथी । म्हणे आपण शूद्रजाती । जात होतो आपुले वृत्ती । स्वामी माते पाचारिले ॥२०॥

लंघिता रेखा पांचवेसी । झाले ज्ञान आणिक तयासी । जन्म झाला वैश्यवंशी । नाम आपुले सोमदत्त ॥२१॥

सहावी रेखा लंघितां । म्हणे आपण क्षत्रिय ख्याता । नाम आपुले विख्याता । गोदावरी म्हणोनि ॥२२॥

सातवी रेखा लंघिताक्षण । अग्रजाती विप्र आपण । वेदशास्त्रादि व्याकरण । अध्यापक नाम आपुले ॥२३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । वेदशास्त्री अभ्यास म्हणसी । आले विप्र चर्चेसी । वाद करी त्यांसवे ॥२४॥

अभिमंत्रोनी विभूति । त्याचे सर्वांगी । प्रोक्षिती । प्रकाशली ज्ञानज्योती । त्या नरा परियेसा ॥२५॥

जैसे मानससरोवरास । वायस जाता होती हंस । तैसा गुरुहस्तस्पर्श । पतित झाला ज्ञानराशी ॥२६॥

नरसिंहसरस्वती जगद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु । अज्ञानी लोक म्हणती नरु । तेचि जाती अधःपाता ॥२७॥

येणेपरी पतितासी । ज्ञान झाले आसमासी । वेदशास्त्र सांगेसी । म्हणो लागला तये वेळी ॥२८॥

जे आले चर्चेस विप्र । भयचकित झाले फार । जिव्हा तुटोनि झाले बधिर । ह्रदयशूळ तात्काळी ॥२९॥

विप्र थरथरा कापती । श्रीगुरुचरणी लोळती । आमुची आता काय गति । जगज्ज्योती स्वामिया ॥३०॥

श्रीगुरुद्रोही झालो जाण । धिक्कारिले ब्राह्मण । तू अवतार गौरीरमण । क्षमा करणे स्वामिया ॥३१॥

वेष्टोनिया मायापाशी । झालो आपण महातामसी । नोळखो तुझ्या स्वरूपासी । क्षमा करणे स्वामिया ॥३२॥

तू कृपाळु सर्वा भूती । आमुचे दोष नाणी चित्ती । आम्हा द्यावी उद्धारगति । म्हणोनि चरणी लागती ॥३३॥

एखादे समयी लीलेसी । पर्वत करसी तृणासरसी । पर्वत पाहसी कोपेसी । भस्म होय निर्धारी ॥३४॥

तूचि सृष्टि स्थापिसी । तूचि सर्वांचे पोषण करिसी । तूचि कर्ता प्रळयासी । त्रिमूर्ति जगद्गुरु ॥३५॥

तुझा महिमा वर्णावयासी । मति नाही आम्हांसी । उद्धरावे दीनासी । शरणागता वरप्रदा ॥३६॥

ऐसे विप्र विनविती । श्रीगुरु त्यासी निरोप देती । तुम्ही क्षोभविला भारती । त्रिविक्रम महामुनि ॥३७॥

आणिक केले बहुत दोषी । निंदिले सर्व विप्रांसी । पावाल जन्म ब्रह्मराक्षसी । आपुली जोडी भोगावी ॥३८॥

आपुले आर्जव आपणापासी । भोगिजे पुण्यपापासी । निष्कृति न होता क्रियमाणासी । गति नाही परियेसा ॥३९॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । लागती विप्र दोघे चरणी । कधी उद्धरो भवार्णवी । म्हणोनिया विनविती ॥४०॥

श्रीगुरुनाथ कृपामूर्ति । त्या विप्रांते निरोप देती । ब्रह्मराक्षस व्हाल प्रख्याति । संवत्सर बारापर्यंत ॥४१॥

अनुतप्त झालिया कारण । शांतिरूप असाल जाण । जो का शुकनारायण । प्रथम वाक्य म्हणतसा ॥४२॥

तुमचे पाप शुद्ध होता । द्विज येईल पर्यटता । पुढील वाक्य तुम्हा सांगता । उद्धारगति होईल ॥४३॥

आता जावे गंगेसी । स्थान बरवे बैसावयासी । म्हणोनि निरोपिती त्यासी । गेले विप्र ते वेळी ॥४४॥

निघता ग्रामाबाहेरी । ह्रदयशूल अपरंपारी । जाता क्षण नदीतीरी । विप्र पंचत्व पावले ॥४५॥

आपण केल्या कर्मासी । प्रयत्‍न नाही आणिकासी । ऐसे विप्र तामसी । आत्मघातकी तेचि जाणा ॥४६॥

श्रीगुरुवचन येणेपरी । अन्यथा नव्हे निर्धारी । झाले राक्षस द्विजवरी । बारा वर्षी गति पावले ॥४७॥

विप्र पाठविले गंगेसी । मागे कथा वर्तली कैसी । नामधारक शिष्यासी । सिद्ध सांगे अवधारा ॥४८॥

पतित झाला महाज्ञानी । जातिस्मरण सप्तजन्मी । पूर्वापार विप्र म्हणोनि । निर्धार केला मनात ॥४९॥

नमन करूनि श्रीगुरूसी । विनवी पतित भक्तीसी । अज्ञानमाया तिमिरासी । ज्योतिरूप जगद्गुरु ॥५०॥

विप्र होतो पूर्वी आपण । केवी झालो जातिहीन । सांगावे जी विस्तारोन । त्रिकाळज्ञान अंतरसाक्षी ॥५१॥

जन्मांतरी आपण देख । पाप केले महादोष । की विरोधिले विनायक । नृसिंहसरस्वती सांग पा ॥५२॥

ऐसे वचन ऐकोनि । सांगती गुरु प्रकाशूनि । म्हणोनि सांगती सिद्धमुनि । नामधारक शिष्यासी ॥५३॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । पुढील कथा ऐकता नर । पतित होय ब्रह्मज्ञानी ॥५४॥

ऐसी पुण्यपावन कथा । ऐकता उद्धार अनाथा । पावे चतुर्विध पुरुषार्था । निश्चयेसी जाण पा ॥५५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मदोन्मत्तविप्रशापकथनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥

ओवीसंख्या ॥५५॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment